
जर ड्रग एडिक्ट आढळली, तर चूक स्वीकारून कायमची मुंबई सोडेन : गृहमंत्रीला कंगनाच चैलेंज
मुंबई (तेज समाचार डेस्क) सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणापासून कंगनाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. आता तर थेट कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे चित्र ऊभे झाले आहे. विधानसभा पावसाळी अधिवेशनात आज कंगनाविरुद्ध सूर निघाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कंगनाची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार असे म्हटले. यावर कंगनानेही (Kangana Ranaut) गृहमंत्र्यांना चॅलेंज केले असून माझी कृपया माझी टेस्ट करा. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग पेडलरसोबत माझी कोणती लिंक मिळाली तर मी माझी चूक स्वीकारेन असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाने मध्यंतरी स्वतः कधीकाली ड्रग्ज घेत होते त्यामुळे ड्रग्जच्या पार्ट्यांबद्दल आपल्याला माहिती असल्याचे ती एका व्हीडिओमध्ये बोलून गेली. तसेच, शिवसेना (Shivsena) नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. या आधारावर गृहमंत्री अनिल देशमुख कंगनाची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार आहे.
यावर कंगनाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना चॅलेंज केले आहे की, जर तुम्हाला ड्रग पेडलरसोबत माझी कोणती लिंक मिळाली तर मी माझी चूक स्वीकारेन आणि कायमची मुंबई सोडून देईन असे कंगनाने म्हटले आहे.