कंगनाने तापसी पन्नूवर केली स्टाईल चोरीचा आरोप

Featured महाराष्ट्र
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या काही महिन्यांपासून कंगना (Kangana Ranaut) कोणता ना कोणता वाद आवर्जून ओढवून घेते. विविध मुद्द्यांवरून बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकारांशी पंगा घेत असते. यावरून ती ट्रोलही होते तर तिचे फॅन्स तिची बाजूही सावरून घेत असतात. ट्रोल झाली असली तर कंगना सोशल मीडियावर व्यक्त होण्यास घाबरत नाही. आता कंगनाने तापसी पन्नूच्या एका फोटोशूटवरून तिच्यावर स्टाईल चोरीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर कंगनाने स्वतःला अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) म्हणवून घेतले आहे. दुसरीकडे तापसीनेही कंगनाला जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात तापसी विरुद्ध कंगना असे सोशल मीडिया वॉर दिसणार आहे.

तापसी पन्नूने (Taapsee Pannu) काही दिवसांपूर्वी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील एक फोटो एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत या यूजरने लिहिले, ‘तापसीने एक हजाराव्या वेळी कंगनाची कॉपी केली आहे. एवढेच नव्हे तर या यूजरने कंगना आणि तापसीचा फोटो सोबत शेयर केला आहे. या फोटोमध्ये दोघींना काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असून दोघींची पोजही सेम असल्याचे दिसत आहे. यूजरच्या या पोस्टवर कमेंट करताना कंगनाने म्हटले आहे, ‘हा हा हा. मी खूप आनंदी झाले आहे. ती माझी खरी फॅन आहे. तिचे पूर्ण अस्तित्व माझी नक्कल करण्यामुळेच आहे. आणि हे खूपच प्रभावित करणारे आहे. तसे पाहिले तर माझ्याप्रमाणे एकही महिला सुपरस्टार अभिनेत्री पॉप कल्चर पुढे घेऊन जाऊ शकली नाही. अमिताभ बच्चन यांच्यानंतर सगळ्यात जास्त माझीच नक्कल करण्यात आली आहे असेही कंगनाने म्हटले आहे.

दुसऱ्या एका यूजरनेही या दोघींचा फोटो टाकला असून त्यातही दोघींची पोज आणि केसांची स्टाईल सेम असल्याचे दिसत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटले आहे, हे वेड लावणारे आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर तापसीने एक ट्विट करून कंगनाला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. तापसीने पोस्टमध्ये कंगनाचे नाव न घेता रॉबर्ट ए हेनलेन यांची एक ओळ लिहिली आहे. ही ओळ आहे ‘एक सक्षम आणि आत्मविश्वासाने भरलेलीनव्यक्ती कोणत्याही गोष्टीची ईर्ष्या करण्यास असमर्थ असते. ईर्ष्या असुरक्षेचे लक्षण आहे. खरे तर आता हे प्रत्येक दिवशी होत आहे.’ एका अर्थाने तापसीने कंगनाला ईर्ष्येने ग्रस्त महिलाच म्हटले आहे. तापसीच्या या पोस्टवर कंगना काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *