
नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल ‘कांदा फेको’ आंदोलन
नंदुरबार ( वैभव करवंदकर) नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून कांद्यावरील बंदी निर्यात उठविण्याचा मागणीसाठी नंदुरबारात रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळालाकडून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन सादर करण्यात केले. त्यात म्हटले, ‘व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशी भूमिका केंद्र सरकारकडून सातत्याने घेतली जात आहे. शेतकऱ्याला कांद्याच्या भाव चांगला भेटत असतानाच केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीवर निर्यात बंदी लावली.
लाखो टन कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत असून, निर्यात बंदीचे कारण देऊन व्यापारी कवडी मोलाच्या भावने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जात आहे.असल्याचे निवेदनात म्हटले आहे
कोरोना साथीच्या आजारामुळे पहिलेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा वेळेस थोडासा दिलासा कांद्याच्या उत्पादनातून होत होता. परंतु,केंद्र सरकारने कांदा निर्यातवरच बंदी केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरिल निर्यात बंदी तातडीने उठवावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते उदेसिंग पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,मोहन शेवाळे, सिताराम पावरा, पदवीधर अध्यक्ष योगेश पाटील , राकेश जाधव, विद्यार्थी अध्यक्ष बबलू कदमबांडे, रवी सोनवणे, वामन पिंपळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.