कल्याण : रुग्णालयातून पळालेला रुग्ण फुटपाथवर मृतावस्थेत आढळला
कल्याण (तेज समाचार डेस्क) येथील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू झाला या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला अशी माहिती आहे. स्थानिक रहिवाशांनी रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. थोड्यावेळाने त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले .
शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांनी सांगितले की आयसीयूमध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता. मात्र आयसीयूमध्ये इतर 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता. ते मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय कर्मचारी व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळाला. माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
पळालेल्या रुग्णाचा मृत्यु कसा झाला, याचा तपास केला जात आहे.