
काळ्या बाजारात धान्य विक्री केले रेशन दुकानदारावर गुन्हा नोंद
काळ्या बाजारात धान्य विक्री केले.रेशन दुकानदारावर गुन्हा नोंद
धुळे (तेज समाचार डेस्क): लॉक डाऊन परिस्थितीत रेशन दुकानातील माल दुकानदाराने काळ्या बाजारात विक्री केला.याची माहिती मिळताच तातडीने साक्रीतील पुरवठा निरीक्षक यांनी रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील दुकान क्रमांक 16 दुकानदार श्री अशोक शामराव मरसाळे यांनी रेशन दुकानातील धान्य तांदूळ अंदाजे 45 किलोग्राम काळ्याबाजारात विकण्यासाठी आपल्या मुलगा अमोल अशोक मरसाळे यांच्यामार्फत स्कुटी या वाहनाद्वारे किरकोळ अन्नधान्य विक्रेता दुकानदार श्री छोटू कोठावदे यांच्या दुकानाच्या पुढे आढळून आल्याने संबंधित रेशन दुकानदार श्री अशोक शामराव मरसाळे व अमोल अशोक मरसाळे यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे सुशीला जिजिराम बागुल वय 55 पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय साक्री यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सर्व रेशन दुकानदार यांना सुचित करण्यात येते की अशाप्रकारचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत तसेच किरकोळ अन्नधान्य खरेदी करणारा किंवा विक्रेते यांनी कुठल्याही व्यक्तीकडून रेशनचे धान्य खरेदी करताना आढळल्यास संबंधित किरकोळ दुकानदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील.