
निव्वळ सातशे रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक महिलेला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि):निव्वळ सातशे रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक महिलेला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लिपिक संगीता शिंपी यांना लाच घेताना रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते त्यांचे वडिलांचा सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा रक्कम मिळणे करता गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी जिल्हा परिषद धुळे येथील शिक्षण विभागात प्रस्ताव पाठवला होता. तेथील कनिष्ठ लिपिक महिला श्रीमती संगीता शिंपी यांनी तक्रारदाराचे यांचे वडिलांचे ७ वा वेतनाचा फरक ४९,९३४ रुपये मंजुरी करता प्राप्त झाल्याचे संगणकावर दाखवून सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी कोषागार विभागास पाठवण्यासाठी 934 रुपये लाचेची मागणी केली. सदर तक्रारदार यांच्याकडे आज तडजोडी अंती 700 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक महिला संगीता शिंपी यांना रोख रकमेसह अटक केली. सदर कारवाई लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.