
हीरो सोबत झोपल्यावर मिळते, दो मिनिटाचा रोल; कंगनाचे जया बच्चनला सडेतोड उत्तर
मुंबई (तेज समाचार डेस्क). अभिनेते आणि भाजपा (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणाऱ्या ड्रग्स (Drugs) सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. जया बच्चन यांनी यावर आक्षेप घेत “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत टीका केली होती. कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट (Tweet) केलं असून जया बच्चन (Jaya Bacchan)आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं म्हटलं असून हिरोसोबत झोपल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.
कंगना (Kangana Ranaut) ने जया बच्चनला खडसाउन विचारले की, “जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान जया बच्चन यांनी कंगनाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यानंतर कंगनाने लगेचच ट्विट करत माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता असती तर तुम्ही असंच म्हणाला असता का असा सवाल विचारला होता. इतकंच नाही तर अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? असा सवाल विचारत आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं होतं.