जय श्रीराम; यावल तालुक्यात पोहोचला अयोध्येचा पावन प्रसाद

Featured जळगाव
Share This:

जय श्रीराम ! सियावर रामचंद्र की जय !

यावल (सुरेश पाटील) श्री राम जन्मभूमि मंदिर भूमिपूजन सोहळ्यात यावल तालुक्यातील फैजपूर येथील प. पु. जनार्दन हरिजी महाराज यांना आमंत्रित केले होते त्यानुसार प.पु.महाराज अयोध्या येथे भूमिपूजन समारंभा साठी उपस्थित राहिले होते,अशा ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून त्यांना सम्मान मिळाला आणि त्यांना तेथील श्रीराम जन्मभूमी भूमिपूजन समारंभातील पवित्र असा प्रसाद मिळाला होता तो त्यांनी आपल्या भाविकांसाठी जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात आणून आपल्या प्रिय भक्तांसह भाविकांना दिला. हा सन्मान आणि प्रसाद सर्व खान्देशच्या जनते प्रयन्त पोहोचला आहे. अशा प्रसंगी त्यांचे दर्शन घेऊन त्यांनी अनुभवलेली अयोध्या त्यांच्या स्वतःकडून ऐकण्याची संधी यावल येथील समाजसेवक तथा स्त्री रोग तज्ञ डॉक्टर कुंदन फेगडे यांच्यासह अनेकांनी वेळेनुसार कोणतीही गर्दी न करता निष्कलंक धाम वढोदा,तालुका यावल येथे त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद व प्रसाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त करून घेतले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *