‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ मिळणारे जावेद अख्तर पहिले भारतीय
मुंबई (तेज समाचार डेस्क): सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याआधी हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दार्शविक क्रिस्टोफर हिचेंस यांना मिळाला आहे.
जावेद अख्तर (७५) ट्विटरवर सक्रीय आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर मत व्यक्त करतात. नुकतेच, सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), तबलिगी जमात, इस्लामोफोबिया याववर त्यांनी सडेतोड मत व्यक्त केले होते. जावेद अख्तर यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.