जामनेरला पुन्हा एकाच घरातील ९ जणांना कोरोना

Featured जळगाव
Share This:

जामनेर : शहरात व तालुक्यात हळुहळु लॉकडाऊन शिथील करण्याच्या पाठो-पाठ कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येतही वाढ होतांना दिसत आहे, ९ रोजी या एकाच दिवशी पुन्हा एकाच घरातील तब्बल ९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील ४० तर ग्रामीण भागातील ९ अशी तालुकाभरातील संख्या ४९ झाली आहे.

तीन-चार दिवसांपुर्वी घरातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला जळगांव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर घरातील त्या रूणाच्या संपर्कातील इतरांचा स्वॅब घेण्यात आला होता.त्यांचा अहवालही पॉझिटीव्ह आल्याने एकाच घरातील रुग्णसंख्या ९ झाली असून ८ रोजी देखील एकाच कुटूंबातील १० व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

अनलॉकचा तिसर्‍या टप्प्याला सुरूवात झाल्याने बहुतांश बाजारपेठ खुली झाल्याने नागरीक आता प्रशासनाने दिलेल्या आवश्यक कोणत्याही सुचनांचे पालन करतांना दिसत नाही. विविध वस्तु-किराणा आदींच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यावेळी सामाजीक अंतर तर सोडाच पण बरेच नागरीक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुचनांचे नागरीक पालन करीत नसल्याने रुग्ण संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *