जळगाव जिल्ह्यात तिघांची आत्महत्या, अभ्यास- आजार- कौटुंबिक वाद

Featured जळगाव
Share This:

जळगाव – शहरात बुधवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये तिन जणांनी आत्महत्या केली. यात अल्पवयीन विद्यार्थ्यांने अभ्यासाला ताण घेवून तर विवाहितेने आजाराला कंटाळून गळफास घेतली. तसेच कौटुंबिक वादातून तरुणाने विहीरीत उडी घेतली.

अभ्यासाचा ताण घेवून अल्पवयीन मुलाची गळफास

जळगाव –  अभ्यासाचा ताण घेवून भितीपोटी अल्पवयीन मुलाने घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिप सुरेश रावतोडे (१५,रा.जुने भगवान नगर, जळगाव) हा यंदा दहावीच्या वर्गात गेला होता. घारात आई-वडिलांसह राहतो. वडीलांचे इलेक्ट्रिकचे कामे करतात. दिप हा यावर्षी दहावीत गेला होता. अभ्यासाचा ताण घेतल्याने भीतीपोटी त्याने रात्री पंख्याला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी वडील त्याला उठवाला गेले असता तो पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अभ्यासाच्या भीतीने मुलाने आत्महत्या केल्याची माहिती वडील सुरेश रावतोडे यांनी सांगितले. चंदू तुकाराम रावतोडे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

 

कौटुंबिक वादातून तरूणाची विहीरीत उडी

 
जळगाव-  सततच्या कौटुंबिक वादातून ३७ वर्षीय तरूणाने बांभोरी नदी पात्रातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष फकिरा आंभोरे (३७, रा. पिंप्राळा हुडको ह.मु. बांभोरी ता. धरणगाव) हा तरूण वाळूच्या ठेक्यावर हातमजूरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या आठवड्यापासून घरघुती वादातून पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी खेडी कढोली येथे माहेरी निघून गेल्या होत्या. बांभोरी नदी पात्रातील पाळधी गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या केली. विहीरीत तरूणाने उडी घेतल्याचे बांभोरी गावातील काही ग्रामस्थांनी पाहिले होते. पोहण्यासाठी त्याने उडी घेतली असावी असा समज झाला. मात्र काही मिनीटानंतर तो वर आला नसल्याची शंका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी विहीरीजवळ धाव घेतली. अर्ध्यातासानंतर काही पोहणार्‍यांनी त्याचा मृतदेहच बाहेर काढला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परीवार आहे.

 

आजाराला कंटाळून विवाहितेने संपवली जीवनयात्रा

जळगाव –  दुर्धर आजाराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने बुधवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील बळीराम पेठेत घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  आशा सुनिल कुमावत (३९, रा. बळीराम पेठ) यांना गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांनी दुर्धर आजार जडला होता. त्यांच्यावर नाशिक येथील तज्ञ डॉक्टरांचे औषधोपचार सुरू होते. त्याचे पती सुनिल नानासाहेब कुमावत हे पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीस आहे. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कामाला निघून गेले. तर मुलगा हा शाळेत गेला होता. सततच्या आजाराला कंटाळून सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी सुनिल कुमावत यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप बडगुजर करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *