
तापी नदीला पाणी आल्याने यावल बोरावल शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी रस्ता बंद
तापी नदीला पाणी आल्याने यावल बोरावल शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी रस्ता बंद.
भुसावल आणि किनगाव मार्गे 20 किलोमीटर जास्त अंतराचा प्रवास करावा लागणार.
यावलकरांचा शॉटकट बंद.
यावल (सुरेश पाटील): शेळगाव बॅरेज जवळ तापी पात्रात दरवर्षी तात्पुरता कच्चा पूल तयार करण्यात येतो परंतु तापी नदी पात्रात हतनूर धरणातून पाणी सोडल्याने हा तात्पुरता पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वाहनांची तसेच पायदळ जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे पर्यायी यावल परिसरातील नागरिक वाहनधारक बोरावल शेळगाव मार्गे जळगावला जात होते भुसावल आणि किनगाव मार्गे यावल परिसरातील नागरिकांना जळगाव हे अंतर पन्नास किलोमीटर आहे परंतु शेळगाव मार्गे हेच अंतर फक्त 28 किलोमीटर येत असल्याने या रस्त्याने उन्हाळ्यात फार मोठी वर्दळ सुरू असते शेळगाव बॅरेज जवळ पावसाळा संपल्यानंतर तापी नदी पात्रातील पाणी कमी झाल्यावर वाहतुकीसाठी कच्चा फुल तयार करण्यात येतो परंतु दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीला पूर आल्यावर हा मार्ग बंद पडत असतो साधारणपणे पावसाळ्यात तीन-चार महिने हा मार्ग होत असतो.यामुळे यावल परिसरातून बोरावल शेळगाव मार्गे जळगाव कडे जाणारा रस्ता आता चार महिने बंद राहील तरी नागरिकांनी या रस्त्याने येणे-जाणे करू नये असे शासकीय स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे