जळगाव: वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करणारी दुकाने/त्यांची दुरस्ती करणारे गॅरेजेस सुरु करण्यास परवानगी

Featured जळगाव
Share This:
जळगाव (तेज समाचार डेस्क): सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.
            कोरोना विषाणू ( कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, धाबे, रिसॉर्ट, फॉर्म हाऊस, रेस्टॉरंट, खानावळी, लॉजिंग, आईसक्रीम पार्लर, सर्व प्रकारची शीत पेयांचे गाडे व दुकाने ( उदा. लिंबू/ सोडा सरबत, बर्फाचे गोळे, आईसकँडी, ऊसाचे रस इ. तत्सम सर्व )  तसेच सर्व प्रकारचे खाद्य पदार्थांचे गाडे ( उदा. चहा, वडा/ भजी पाव, चायनीज, पाणी पुरी इ. तत्सम सर्व) सर्व प्रकारचे सोने- चांदीचे दुकाने, कापड, ऑटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, हार्डवेअर, प्लायवुड, मोबाईल, सलून, ब्यटी पार्लर, फटाके, गॅरेज, स्विट मार्ट, व्हिडीओ गेम्स, सायबर कॅफे, व्हिडीओ पार्लर, साहसी खेळांचे ठिकाणी, वॉटर पार्क्स व कला केंद्रे इत्यादी सर्व प्रकारचे करमणुकीची व खेळाची केंद्रे आणि क्कल्ब  (जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकाने, औषधालय, फळे, भाजीपाला, दुध विक्री दुकाने, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, अंत्यविधी (गर्दी टाळून) व प्रसार माध्य कार्यालये वगळून) पुढील आदेश होईपावेतो पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
       भारत सरकार यांचेकडील आदेश दिनांक 3 एप्रिल, 2020 अन्वये कृषीसाठी उपयोगात येणारे यंत्रसामग्री, त्यांचे स्पेअर पार्ट व ते दुरुस्त करणा-या संबंधित आस्थापना, हायवेवरील (विशेषत: पेट्रोल पंपावरील ) ट्रक व तत्सम मालवाहू वाहने दुरुस्ती करणारे गॅरेजेस/ दुकाने, चहा लागवड/उद्योग यांचेशी संबंधित आस्थापना ( 50 टक्के कर्मचारीसाठी ) इत्यादी बाबी वगळण्यात आलेल्या आहेत.
            त्यानुसार कृषीसाठी उपयोगात येणारे यंत्रसामग्री, त्यांचे स्पेअर पाट्रर्स व ते दुरुस्त करणा-या संबंधित आस्थापना, हायवे वरील (विशेषत: पेट्रोल पंपावरील) ट्रक व तत्सम मालवाहू वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करणारी दुकाने/ त्यांची दुरस्ती करणारे गॅरेजेस, चहा लागवड/उद्योग यांचेशी संबंधित आस्थापना (50 टक्के कर्मचारीसाठी) इत्यादी बाबी वगळण्याबाबत मंजूरी देत आहे.
            या आदेशाचे उल्लघन कोणत्याही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188 व मुबंई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 43 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *