जळगाव महापौरांची तत्परता : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले परिसर केले निर्जंतुक
महापौरांची तत्परता : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले परिसर केले निर्जंतुक
परिसर रात्रीच सील करण्याच्या सूचना : उद्या होणार सर्व्हेक्षण
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): शहरात एकाच दिवशी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच तत्परतेने सर्व परिसर निर्जंतुक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व परिसर रात्रीच सील करून उद्या सर्व्हेक्षण करण्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव शहरात मंगळवारी किती रुग्ण आढळले याची दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी डॉ.राम रावलानी यांच्याकडून माहिती घेतली. जळगावात मंगळवारी आढळून आलेल्या २६ रुग्णांपैकी २३ रुग्णांना अगोदरच रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. २० रुग्ण वाघनगरातील असून इतर रुग्ण सम्राट कॉलनी, पिंप्राळा, मेहरूण, दक्षता नगर, सिंधी कॉलनीतील आहेत.
परिसर निर्जंतुक करून सील करा
महापौरांनी नगरसचिव सुनील गोराणे यांच्याशी संपर्क करून सर्व परिसर निर्जंतुक करण्याच्या सूचना केल्या. तसेच चारही प्रभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व परिसर रात्रीच सील करण्याचे सांगितले. उद्या सकाळीच त्या प्रभागात सर्व्हेक्षण करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.