जळगाव: क्षुल्लक कारणावरुन हॉटेल मालकाचा खून
जळगाव: क्षुल्लक कारणावरुन हॉटेल मालकाचा खून
जळगाव (तेज समाचार डेस्क) : शहरातील नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पितांना झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (५०, रा. आसोदा) यांचा निर्घुण खून झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या आसोदा मटन हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्या सोबत कुठल्यातरी विषयातून त्यांचा वाद झाला. थोड्याच वेळात वाद वाढून हाणामारी सुरु झाली. यावेळी दोघं तरुणांनी चिरमाडे यांच्यावर हल्ला चढविला. यातील एका हल्लेखोराने बिअरची बाटली थेट चिरमाडे यांच्या मानेत खुपसली. त्यानंतर जखमी अवस्थेत चिरमाडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले. दरम्यान, मयत चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पहिले असून त्यातील एकाची ओळख देखील पटली आहे. तर आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण तयार झाले होते.
दोघं संशयित पोलीस स्थानकात हजर
दरम्यान, या खून प्रकरणातील दोघं संशयित शनिपेठ पोलीस स्थानकात हजर झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी शेजारच्या बिअरशॉपी दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ठसे तज्ञ देखील घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, प्रशांत कोळी नामक तरुण अन्य एकासह शनिपेठ पोलीस स्थानकात हजर झाला आहे. दरम्यान, मयत चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पहिले होते. दरम्यान, पोलिसांनी शेजारच्या बिअरशॉपी दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या बिअर शॉपी मालकासोबत हल्लेखोरांनी बिअर फुकट द्यावी म्हणून वाद घातला होता, असेही कळते.