
जळगाव : 25 कोरोना संशयित रुग्णांपैकी सर्व अहवाल निगेटिव्ह
जळगाव : 25 कोरोना संशयित रुग्णांपैकी सर्व अहवाल निगेटिव्ह
जळगाव (तेज समाचार डेस्क) : या अहवालामध्ये अमळनेर येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्तींचा समावेश आहे.
येथील कोविड रुग्णालयात काल (26 एप्रिल) रात्री दहा वाजता उपचारादरम्यान अमळनेर येथील 66 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरच्या रुग्णाला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरचा रुग्ण हा हृदयविकाराने त्रस्त होता.
जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 18 इतकी असून त्यापैकी 5 व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बरी होऊन घरी गेला आहे. तर उर्वरित 12 रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.