जळगाव: कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्यांना जन्म

Featured जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधी ): जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिला गेल्या १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होती. तिचा अहवाल ९ मे रोजी पॉझिटिव्ह असल्याने तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. डॉ. नरेंद्र पाटील यांनी सिझेरीयन करून या महिलेची प्रसूती केली. त्यांना डॉ. आकाश टोकरे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ. काजल साळुंखे, डॉ. जितेंद्र भोळे, परिचारिका निंबाळकर यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही नवजात शिशूंना कोरोनाने ग्रासले आहे की नाही ? या साठी दोघांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *