जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधित झाले 501, दिवसभरात आढळले 9 पॉझिटिव्ह रुग्ण

Featured जळगाव
Share This:

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधित झाले 501, दिवसभरात आढळले 9 पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि) : जिल्ह्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी ही संख्या 501 झाली. दिवसभरात दुपारपर्यंत एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

दरम्यान, रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मध्ये 57 निगेटिव्ह आले आहेत तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे.

तसेच भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 45 निगेटिव्ह तर 2 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी, भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

एरंडोल येथे स्वॅब घेतलेल्या 72 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 501 झाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *