
जळगाव : 1.85 लाखांची दारु नष्ट
जळगाव : 1.85 लाखांची दारु नष्ट
जळगाव (तेज़ समाचार प्रतिनिधि ): जिल्ह्यातील ओझर, ता.चाळीसगाव येथे अवैद्यरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर चाळीसगाव पोलीसांनी छापा मारुन, तब्बल एक लाख ८५ हजार ७७५ रुपयांची दारु व दारुबनविण्याचे साहित्यसह मुद्येमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी २ एप्रिल रोजी करण्यात आली असून याप्रकरणी १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील ओझर येथे संचारबंदीच्या काळात अवैद्यरित्या दारु भट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पो.नि.विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत सोबत सपोनि मयूर भामरे, पोउपनि. महावीर जाधव, सपोउपनि भोसले, पोलिस अंमलदार भटु पाटील, विनोद भोई, गोपाळ बेलदार, प्रवीण सपकाळे, संजय पाटील व इतर पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर गावाचे शिवारात तसेच तितुर नदीचे पात्राजवळील १० गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर कारवाई करण्यात आली, पोलिसांना या ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण १,८५,७७५ रुपयाचा मुद्देमाल आढळून आला, तो त्यांनी जागीच नष्ट केला.
याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तब्बल १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात साहेबराव रुपला गायकवाड (५५) , सिंधुबाई अभिमन गायकवाड (४५), ईश्वर भिकन निकम (४५), धनराज भिका गायकवाड, प्रताप भिका गायकवाड, गोपाळ रमेश सोनवणे(३०), कमलबाई दळवी, शोभाबाई रोहिदास बोरसे(४५) किसन छगन मोरे , अशोक सूर्यवंशीसर्व रा. ओझर यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.