अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्वीकारली

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क): प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ (Jaish-ul-Hind) या दहशतवादी संघटनेने स्वीकरलेली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम ॲपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांच्या मागणीविषयीही उल्लेख आहे.

ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तो घरी सुखरुप पोहचला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली, पण काही झालं नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे. तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा, असा मेसेज टेलिग्राम ॲपवर लिहिण्यात आला आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *