कांदा निर्यात बंदीबाब प्रहार शेतकरी संघटनेचे जेलभरो आंदोलन

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (वैभव करवंदकर) सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी. तसेच आपल्या सरकारच्या शेतकरी विरोधाच्या निषेधार्थ आज आम्हा प्रहार शेतकरी संघटना नंदरबार जिल्हयाच्यावतीने स्वतः जेलभरो आंदोलन करून स्वत अटक करून घेत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून नासिक विभागात दौऱ्यावर आले असता कांदा प्रश्नाविषयी आपल्या जाहीर भाषणातून आमच्या नासिक विभागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अश्वस्त केले होते की, मी तुमचा नासिकचा कांदा खाल्लेला आहे. मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही, असे आपण वारंवार बहुतेक ठिकाण सांगत आले आहात.

आपल्यावर विश्वास ठेऊन महाराष्ट्रात 2014 व 2019 ला नंदुरबार, धुळे, नासिक, जळगाव इत्यादी नासिक विभागातील जनतेने भरभरुन भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून दिले. त्याची परतफेड तुमच्या सरकारने निवडून देणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसून करावे का? आपण मोठा गाजावाजा करून मार्च महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठविली. त्याच्यानंतर कांद्याला जीवनाश्यक वस्तूमधून बाहेर काढले. परत दोन महिन्यातच अशी काय परिस्थती ओढवावी की, कांदा चाळीस-पन्नास रुपये किलो दराने भाववाढ होताच आपल्या सरकारच्या व श्रीमंतांच्या पोटात पोटसूड उठू लागला. व आपण 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन दिलेला शब्द आपल्या सरकारला पंधरा दिवसातच फिरवावा लागला.

कादा उत्पादक शेतकन्यांची व्यथा कांदा लागवडीपासना तर उत्पादनाचा खर्च आपण पाहिल्यास मागील एक वर्षापासून कांदाच्या सतत पडणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला होता. त्यात तुम्हा नियोतबदी व जीवनावश्यक कायद्यातून काद्याला बाहेर काढून शेतकऱ्यांवर फार मोठा उपकार केल्याचे भासविले होते का? तुम्हाला का परत कांदा निर्यात बंदी करावी लागली? वास्तविक आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर राहण्याची भूमिका घेतली असती तर आम्हाला आनंदच झाला असता. परंतु आपल्या सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबून एक प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात असून शेतकऱ्याना सकटाच्या खाईत लोटण्याची आपल्या सरकारने पुरेपुर तजवीज केलेली दिसते. तरी आपण व आपल्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी.

तसेच आपल्या सरकारच्या शेतकरी विरोधाच्या निषेधार्थ आज आम्हा प्रहार शतकरी संघटना नंदरबार जिल्हयाच्यावतीने स्वतः जेलभरो आंदोलन करून स्वत अटक करून घेत आहोत.आपले स्नेहांकीत प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हा कार्यकर्ते बिपीन पाटील योगेश बोरसे राजेंद्र गोसावी किसन वसावे योगेश पाटील छगन कोडी सुरेश सुतार सिंगा वसावे गोपाल पाटील शिवदास कोळी विनोद कोळी भरत पिंपळे अनिल निकुंबे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *