यावल आगारातुन अंतरराज्य बससेवा सुरू- सोमवार पासुन पूणे बस धावणार

Featured जळगाव
Share This:

यावल आगारातुन अंतरराज्य बससेवा सुरू- धुळे, औरंगाबाद बस सुरू. सोमवार पासुन पूणे बस धावणार.
पहिल्या दिवशी ४९७ प्रवाशांचा बसमध्ये प्रवास.

यावल ( सुरेश पाटील): दि.20 गुरूवारी यावल आगारातुन आतंरराज्य बससेवा सुरू करण्यात आली आहे यात प्रारंभी धुळे, औरंगाबाद सुरू करण्यात आली असुन सोमवार पासुन पूणे येथे देखील बससेवा सुरू केली जाणार आहे तर जिल्ह्यात ८ ठिकाणी दैनदिनी बससेवा सकाळी ८ वाजे पासुन सुरू करण्यात आली आहे तर पहिल्या दिवशी यास चांगला प्रतिसाद मिळाला असुन पुर्वीच्या भाड्यात कुठलीचं दर वाढ न करता एसटीबस सेवा सुरू करण्यात आली आहे. तर प्रत्येक फेरीला एस.टी. बस सॅनेटाईज करून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेवुनचं रस्त्यावर निघत आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर २२ मे च्या पहिल्या लॉकडाऊन पासुन यावल आगाराची बससेवा बंद करण्यात आली होती व तेव्हा पासुन रस्त्यावर एसटीबस दिसतचं नव्हती तत्पुर्वी गेल्या महिन्यात व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू केली मात्र त्यास पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला नाही परिणामी पुन्हा बससेवा बंद झाली मात्र, आता केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशा नुसार गुरूवार पासुन अंतरराज्यीय विशेेष काळजी घेवुन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यात धुळे, औरंगाबाद येथे बस सुरू करण्यात आली असुन जिल्ह्यात ८ ठिकाणी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे व या बस फेऱ्यांचे दैनदिनी वेळापत्रक देखील जाहिर करण्यात आलेे आहे प्रत्येक फेरीला आगारा कडून बस ही सॅनेटाईज करण्यात येत आहे. अल्प स्वरूपात प्रवाशी जरी असले तरी एसटी बससेवा ही आता कायम सुरू ठेवण्यात येणार आहे. तेव्हा प्रवाशांना या एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन आगार व्यवस्थापक एस. व्ही. भालेराव यानी केले आहे तर आगारात एसटी बससेवा सुरळीत करण्या करीता सहाय्यक जी. पी. जंजाळ, डी. बी. महाजन, एस. जे. अडकमोल, एस. यु. मोरे, कमलाकर चौधरी आदी परिश्रम घेत आहे.एसटी बस प्रवास करीता प्रवाशांना मास्क बंधनकारक आहे, बसमध्ये चढ उतर करतांना सोशल डिस्टन्स ठेवणे बंधन कारक करण्यात आले आहे.
१२ हजारांचे उत्पन्न.
विविध १० ठिकाणी दिवसभरात ४२ फेऱ्या एसटीबसच्या झाल्या यात १४ हजार ४४५ किमी एसटी बस धावल्या व ४९७ प्रवाशांनी बस मध्येे प्रवास केला याचं उत्पन्न १२ हजार ९९३ रूपयेे इतके आले आहे.
सोमवार पासुन पूणे बससेवा.
सोमवार पासुन यावल ते पुणे ही बससेवा पुर्वीच्या भाड्यात वाढ न करता सुरू केली जाईल सकाळी ७.३० वाजेला सकाळी सात वाजेला पुणे येथून यावल करीता बस राहिल. तर दैनदिनी बससेवेत रावेर ८ वाजेला, जळगाव ८.१०, सावखेडासिम ८.२०, भुसावळ ८.३०, धुळे ९.००, पाल ९.२०, हरिपूरा १०.००,फैजपूर १०.१०, चोपडा १०.१५ असे दैनदिनी बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *