
वाघुर धरण वाऱ्यावर जामनेर तालुक्यासह पाटबंधारे विभागात जोरदार चर्चा
वाघुर धरण वाऱ्यावर जामनेर तालुक्यासह पाटबंधारे विभागात जोरदार चर्चा.
वाघूर धरणाकडे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष.
यावल (सुरेश पाटील): वाघुर धरण हे बांधकाम विभागाकडून कडा कार्यालयाकडे जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कडे पाटबंधारे उपविभाग यावल यांच्याकडे हस्तांतरित झालेले आहे मागील सहा महिन्यापासून मार्च31पर्यंत वाघूर धरणावर नियमित खाजगी कंत्राटी पद्धतीने मंजूर प्रपंच या अधीन राहून तांत्रिक कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी लावण्यात आले होते परंतु मार्च एप्रिल ते आज पावेतो सदर वाघुर धरणाचे सुरक्षा धोक्यात आलेली आहे कारण संबंधित उपविभागीय अभियंता यांच्याशी चर्चा केली असता असे सांगण्यात आले की वरिष्ठ कार्यालयास वाघूर धरणाच्या पावसाळापूर्व व ऑक्टोंबर अखेरपर्यंत खाजगी कंत्राटी कर्मचारी व काही आवश्यक कामे लावण्यासाठी माननीय कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचेकडे आपण सादर केलेली होती परंतु अद्यापपावेतो वारंवार माननीय अधीक्षक अभियंता कडा जळगाव यांनी कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा केली परंतु वारंवार त्यात बदल सांगितल्यामुळे सदर पावसाळापूर्व पावसाळ्यातील कामे करण्यास उशीर होत आहे यास जबाबदार कोण राहील?याबाबत फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,माननीय पालकमंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री जळगाव यांनी सदर वाघुर धरणाकडे प्रलंबित कामे व कर्मचारी लावण्याबाबत सदरील कार्यकारी संचालक यांना त्वरित कर्मचारी लावण्याची परवानगी व पावसाळापूर्व करण्याचे आवश्यक कामे आदेश द्यावेत जेणेकरून गंभीर दुर्घटना किंवा अप्रिय घटना या वाघूर धरणावर मध्ये घडणार नाही अशी जामनेर तालुक्यातील व परिसरातील आणि पाटबंधारे संपूर्ण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह जनतेची अपेक्षा आहे सद्यस्थितीत वाघुर धरण 65 टक्केच्या जवळपास भरलेले आहे अशा संवेदनशील धरणाच्या सुरक्षेबाबत अधिकारी हे पूर्णतः मूग गिळून बसलेले आहेत असे समजते की जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांना काहीना काही कारणांमुळे ब्रेक देऊन जळगाव जिल्ह्याचा विकास थांबवावा असे माननीय कार्यकारी संचालक तथा कार्यकारी अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे नियोजन दिसते यासाठी जिल्ह्याचे सर्व आमदारांनी एकत्र येऊन अशा काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला बाजूला सारून माननीय जलसंपदामंत्री मा.ना.जयंतराव पाटील महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना एकत्रित निवेदन देऊन सदरच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याविषयी कारवाई करावी असे वाघूर धरणाच्या संबंधित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व संबंधित कर्मचाऱ्यांना वाटत असून संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांचाही तशा अपेक्षा आहेत. तरी पाटबंधारे विभागाच्या दृष्टिकोनातून आणि वाघूर धरणाच्या भवितव्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष केंद्रित करून त्वरित कार्यवाही करावी असे सुद्धा बोलले जात आहे.