मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली , बार चालू पण मंदिरे बंद – खा.डॉ. हिना गावित

Featured नंदुरबार
Share This:

मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली , बार चालू पण मंदिरे बंद – खा.डॉ. हिना गावित

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) :महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली, रेस्टॉरंट्स उघडलेत, बार उघडलेत म्हणून राज्यातील जनतेने याचा तीव्र स्वरूपात धिक्कार केलेला आहे. परंतु संतापही व्यक्त केला आहे. राज्यातील मंदिरे त्वरित उघडावीत असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार शहरातील गणपती मंदिरा समोर आंदोलन केले. ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली . त्यानंतर नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर केले . येत्या आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकत्यांसह रस्त्यावर उतरेल आणि तीन स्वरूपाचे आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आणि प्रशासनाची राहील.

राज्यातील लाखो भाविक मंदिरातील दर्शनासाठी भावुक झालेले आहेत. त्यांच्या भावनांची कदर सरकारने करावी आणि विनाविलंब योग्य ती काळजी घेत मंदिरे उघडी करावीत असेही या निवेदनाद्वारे सरकारला आवाहन करीत आहे.
खा.डॉ हीन गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नरेंद्र माळी ,माणिक माळी निलेश माळी , चारुदत्त काळवणकर लक्ष्मण माळी, हर्षल पाटील, संजय शाह,सपना अग्रवाल, संगीत सोनवणे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *