यावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ने केला नवा विक्रम ….उंटावद, गिरडगाव 100 टक्के पूर्ण

यावल (तेज समाचार डेस्क):आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र किंनगव येथे सौ अरुणा ताई रामदास पाटील जिल्हा परिषद सद्यस्य यांच्या विशेष प्रयत्नतुन 2000 कोविशील्ड लस मिळाली आणि याच संधीचे सोन करून प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉ मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 2200 लोकांना लस देऊन किंनगव आरोग्य केंद्राने यावल तालुक्यात उच्चकं गाठून विक्रम नोंदवला. याबद्दल डॉ मनिषा महाजन यांनी सांगितले की ,माजी जि. प सद्यस्य श्री रामदास पाटील यांनी किंनगव येथे लसीकरण साठी लोकांची होणारी तारांबळ पाहता जास्त लस कसे मिळेल यावर काम जोर दिला ,आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि सौ अरूनाताई यांनी 2000 लस आम्हाला मिळवूं न दिली असे डॉ मनिषा महाजन यांनी सांगितले.
आज आम्ही 2000 लसीचे वितरण करताना गिरडगाव 330,उंटावद 275,मालोड 220,आडगाव 484,किंनगव 616 ,डोंनगव 275 असे लसीचे डोस 18 वर्षवरील नागरिकांना देण्यात आल्या.
त्यात उंटावद आणि गिरडगाव येथे पहिल्या डोस चे 100 टक्के काम झाले आणि दिवसभरात आरोग्य केंद्राने 2200 लस देऊन उच्चकं गाठला आणि 2 गाव 100 टक्के करून रात्री 10 :15 पर्यंत काम सुरू ठेवून विक्रम नोंदविला.
यासाठी सुरुवातीपासून नियोजन बद्द लसीकरण कार्यक्रम आखला ,त्यात टीम चे सहकार्य अमूल्य होते ,माझा टीम शिवाय हे काम होऊ शकले नसते असे डॉ मनिषा महाजन यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले .
यासाठी माझे सर्व सहकारी डॉ अमोल पाटील ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अशपाक,डॉ वकार, डॉ मोहसीन,डॉ धनंजय, तसेच आरोग्य सहाय्यीका उषा पाटील,आरोग्य सेविका श्री कुमुदिनी इंगळे,भावना वारके,कविता सपकाळे,शीला जमरा, कल्पना सूर्यवंशी,मंगला सोनवणे, नावादी बरेला, आरोग्य सेवक,विठ्ठल भिसे,दीपक तायडे,जीवन सोनवणे,मनोज बरेला ,डेटा एन्ट्री भुपेंद्र महाजन,रवींद्र व्हावी, प्लेबोटोमिस्ट जीवन महाजन शिपाई, सरदार कानाशा, वाहन चालक कुर्बान तडवी आणि सर्व आशा सेविका ताई यांनी विशेष प्रयत्न केले आणि आमची मोहीम फत्ते केली .
यामुळं डॉ.मनिषा महाजन व त्यांचं टीम चे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ भीमशकांर जमादार,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे डॉ प्रमोद पांढरे,आणि तालुका आरोग्य आधिकरी डॉ हेमंत बरहाटे यांनी कौतुक व अभिनंदन केले ,तर किंनगव येथील सरपंच सौ निर्मला संजय पाटील यांनी आमच्या गावाला मनीषा महाजन डॉक्टर मिळाले म्हणून आम्ही कौतुक करतो पण असे डॉक्टर सर्व कडे असले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल असे बोलून अभिनंदन केले.तर जि प सद्यस्य सौ.अरूनताई रामदास पाटील यांनी डॉ मनिषा महाजन आणि टीम चे कौतुक करून अभिनंदनन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *