गांधीनगर (तेज़ समाचार डेस्क ): केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवमान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इटलीचे पर्यावरण मंत्री सर्जिओ कोस्टा यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधिमंडळाने भेट घेतली. यावेळी भारत आणि इटलीत द्विपक्षीय बैठक झाली तसेच पर्यावरण आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री आणि भारत आणि इटलीचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत स्थलांतरीत वन्यजीव प्रजातींचे संवर्धन या विषयावरील परिषदेचे व्हिडीओ लिंकद्वारे उद्घाट केले . गुजरातच्या गांधीनगर येथे 17 ते 22 फेब्रुवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 130 देशांचे प्रतिनिधी, तज्ञ, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.