स्वातंत्र्य दिनी कोरोना योद्धा प्रशस्तीपत्रकाची खिरापत

Featured जळगाव
Share This:

स्वातंत्र्य दिनी कोरोना योद्धा प्रशस्तीपत्रकाची खिरापत

कर्तव्य शून्य आणि अनोळखीचा समावेश

आयोजकांचा बौद्धिक प्रश्न उपस्थित.

यावल ( सुरेश पाटील ): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावल तालुक्यात ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले तसेच सहकार्य केले त्यांच्यासोबत तालुक्यातील इतर काही निष्क्रिय आणि कोरोना योद्धा म्हणून त्यांना प्रशस्ती पत्र देणारे संबंधिताना ओळखत नसताना सुद्धा 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोरोना योद्धा म्हणून प्रशस्ती पत्र देणार असल्याने आयोजकांच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्यावर्षी अशाच प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आपल्या विभागात 30 ते 40 प्रतिनिधी पैकी आपल्या खास विश्वासातील आणि हुजरेगिरी करून चमकोगिरी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यावेळेस कोणते निकष लावण्यात आले होते ? आणि कोणालाही न समजू देता ती नांवे प्रसिद्ध करण्यात आली होती याबाबत संपूर्ण विभागात तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि आहे.
त्याचप्रमाणे आता पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना विषाणू संसर्ग संधी साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गांवागांवात समाजात जनजागृतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सक्रिय प्रतिनिधीना कोरना योध्दा म्हणून प्रशस्ती पत्र देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आयोजकाचा हा कौतुकास्पद निर्णय आहे.
परंतु आयोजक किंवा आयोजकांची समिती मार्फत तालुक्यातून किंवा आपल्या विभागातून कोरोना योद्धा म्हणून प्रशस्ती पत्र जे देणार आहे त्याबाबत आयोजकांनी काय निकष निश्चित केले ? हा प्रश्न उपस्थित होत असून आयोजकाने तालुक्यात काही 2 ते 4 जणांना वैयक्तिक व्हाट्सअप वरून मेसेज टाकून कोरोना योद्धा प्रशस्ती प्रमाणपत्र देणार असल्याने आपल्याकडील नांवे तात्काळ पाठवा असा मेसेज दिला. आयोजक ओळखत नसल्याने यादी मागविली आहे का ? कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी काही प्रत्यक्ष कृती केली नाही, जन जागृतीचे काम केले नाही अशांना सुद्धा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र खिरापत म्हणून दिले जाणार आहे का ?
असे अनेक प्रश्न फैजपुर विभागात उपस्थित केले जात असून जोरदार चर्चा सुरू आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *