
मालेगावात 7 रुग्णांची वाढ- रुग्णसंख्या ३०० पार
मालेगावात 7 रुग्णांची वाढ- रुग्णसंख्या ३०० पार
मालेगाव (तेज समाचार डेस्क): शहरात करोनाचा कहर सुरूच असून आज सकाळी प्राप्त अहवालानुसार शहरात ७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८२ झाली असून यातील १३ रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे तर २० रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे झालेले रुग्ण आपल्या घरी परतले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३०० पार
नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३०० पार गेली असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३०४ रुग्ण आढळून आले आहे. मालेगाव शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज एकूण २३ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यात १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ११ निगेटिव्ह आहेत. या १२ पॉझिटिव्ह रुग्णामध्ये ५ रुग्णांचे अहवाल फेर तपासणीत पॉझिटिव्ह आले आहेत तर ७ रुग्ण नवीन आहेत. शहरात ७ नवीन रुग्णांची भर पडल्याने शहरातील रुग्ण संख्या २८२ इतकी झाली आहे.