
देशांतर्गत फ्लाइट उड्डाणात वाढ
देशांतर्गत फ्लाइट उड्डाणात वाढ
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशांतर्गत उड्डाणात एअरलाइन्स कंपन्यांना केंद्र सरकारने वाढ केली दिला आहे. या कंपन्यांच्या 60 टक्के फ्लाइट उड्डाणांना मंजुरी देण्यात आली. यापूर्वी जूनच्या अखेरीस विमान उड्डयन मंत्रालयाने 45 टक्के फ्लाइट सुरू करण्यास मंजुरी दिली होती. कोरोना महामारीच्या (Corona Crises) संकटामुळे अडचणीत आलेल्या विमान कंपन्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
डोमॅस्टिक एअरलान्सकडून त्यांच्या पूर्वीच्या क्षमतेच्या 60 टक्क्यांपर्यंत देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. यापूर्वी जून महिन्याच्या अखेरीस मिनिस्ट्री ऑफ सिव्हील एव्हिएशनने 45 टक्के फ्लाइट्स सुरू करण्यात मान्यता दिली होती. कोरोना महामारीच्या काळात जवळपास दोन महिने डोमॅस्टिक फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली. नंतर पहिल्या टप्प्यात 25 मे रोजी फ्लाइट्सना मंजुरी देण्यात आली. त्यांची संख्या अतिशय कमी होती. त्यानंतर यात वाढ करण्यात आल्याने सरासरी ऑक्युपसी रेट पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने खासगी कंपन्यांची आंतरराराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवली असली तरी वंदे भारत मिशनच्या माध्यमातून अनेक स्पेशल इंटरनॅशनल फ्लाइट्स सुरू केल्या आहेत. द्विपक्षीय एअरबबलच्या अनुषंगानेही फ्लाइट्स सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे