यावल तालुक्यात ‘गोवंश’ वाहतूक बिनधास्तपणे सुरू.6 गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती यावल पोलिसांच्या ताब्यात

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात ‘गोवंश’ वाहतूक बिनधास्तपणे सुरू.6 गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती यावल पोलिसांच्या ताब्यात.

‘गो’ सेवकांच्या सतर्कतेमुळे यावल पोलिसांची कारवाई.

आज दि.23बुधवार रोजी सकाळी 4 वाजेची घटना

यावल (सुरेश पाटील): रावेर-यावल-चोपडा तालुक्यातुन जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व सरळ एका रेषेत असणाऱ्या महामार्गावर ‘गोवंश’ वाहतूक बिनधास्तपणे सुरू असून6गोवंश वाहतूक करणारा एक छोटा हत्ती ‘गो’सेवकांच्या सतर्कते मुळेआज दि.23बुधवार रोजी सकाळी4वाजता यावल पोलिसांच्या ताब्यात आला आहे पुढील कार्यवाही यावल पोलिसांनी सुरू केल्याचे सुद्धा समजले.
राज्यात महाआघाडीचे सरकार आहे रावेर विधानसभा मतदार संघातून पूर्व भागातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी तर चोपडा विधानसभा मतदार संघातून पश्चिम विभागातून शिवसेनेच्या आमदार लताताई सोनवणे निवडून आलेल्या आहेत योगायोगाने हे दोघं मतदार संघ पूर्व-पश्चिम एका सरळ रेषेत बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रावेर -यावल -चोपडा तालुक्याच्या माध्यमातून आहेत, हे दोघं आमदार सत्ताधारी पक्षातील महाआघाडीमधील असल्याने या तीन तालुक्यातून जाणाऱ्या एकूण 80 ते 90 किलोमीटर महामार्गावर एका सरळ रेषेत रावेर,सावदा,फैजपूर, यावल,अडावद,चोपडा इत्यादी प्रमुख ठिकाणी पोलीस स्टेशन माध्यमातून पोलिस कर्मचारी तैनात आहेत असे असताना सुद्धा या महामार्गावरून अवैध अनाधिकृत वाहतूक बिनधास्तपणे रात्रंदिवस सुरू आहे ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानासुद्धा अनाधिकृत अवैध वाहतूक अवैध धंदे सुरू असल्याने संपूर्ण यंत्रणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.
आज दिनांक 23 बुधवार रोजी सकाळी4 ते4:30वाजेच्या सुमारास यावल शहरातील व परिसरातील गो सेवकांना गोवंश वाहतूक करीत असलेल्या वाहनाचा सुगावा लागल्याने त्यांनी पाळत ठेवून यावल येथे यावल पोलीस स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर फैजपूर रोडवर कॉलेज जवळ एकूण6सदृढ आणि उत्तम स्थितीत असलेले गोवंश(वळू) एका वाहनात कोंबून वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन क्र.MH-43-BB-0409 यावल कडून फैजपुर कडे जात असताना यावल शहरातील व परिसरातील गो सेवकांना आढळून आल्याने त्यांनी छोटा हत्ती पकडून यावल पोलिसांच्या ताब्यात दिला.
एकाच वाहनात6गोवंश निर्दयतेने(वळू)कोंबून नेता येतात का?गोवंश वाहतुकीचा परवाना ज्यावेळेस दिला जातो तो परवाना देतानाच्या अटी शर्ती कोणत्या आहेत त्यानुसारच ‘गोवंश’ ‘गो’ वाहतुक करण्यात येत आहे का? याकडे परवाना देणारे आणि यावल पोलिसांनी लक्ष केंद्रित करून दररोज सर्रासपणे सुरू असलेली सर्व प्रकारच्या अवैध (गोवंश,’गो’ वाहतूक,गुटखा, अवैध प्रवासी वाहतूक,वाळू, गौण खनिज)अनधिकृत वाहतूक नियमानुसार वाहतूक व्हायला पाहिजे आणि अनधिकृत असल्यास गैरकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे रावेर,यावल,चोपडा तालुक्यात बोलले जात आहे. यावल पोलीस स्टेशनला ताब्यात असलेला गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती संबंधित चालक मालकाविरुद्ध, गोवंश मालकाविरुद्ध यावल पोलीस कोणत्या कलमान्वये काय चौकशी आणि कारवाई करून कोणता गुन्हा दाखल करतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *