ओला व सुका कचरा संकलनात, वजनात ठेकेदाराच्या पंटरानकडून जादू

Featured जळगाव
Share This:

ओला व सुका कचरा संकलनात, वजनात ठेकेदाराच्या पंटरानकडून जादू
विकसित भागातील रस्त्यांचे वाजले बारा.
यावलकरांमध्ये संतप्त भावना.

यावल (सुरेश पाटील) : यावल शहरात ओला व सुका कचरा वाहतूक अनिमितपणे होत असताना संबंधित ठेकेदाराकडून आणि त्यांच्या पंटराकडून ओला व सुका कचरा वाहतुकीत मोठा घोळ होत असल्याने ठेकेदारांच्या पंटराकडून जादूने कचऱ्याचे वजन वाढत असल्याने तसेच यावल शहरात विकसित भागात नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आल्याने रस्त्याचे संपूर्ण बारा वाजले या रस्त्यावर पायदळ चालणे मुश्कील झाले असून दुचाकी वाहने सुद्धा चालवणे मोठे त्रासदायक ठरत असल्याने यावल करांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून संबंधित काही लोकप्रतिनिधी बाबत सुद्धा यावल शहरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे म्हणून यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी ठेकेदारांवर कडक कारवाई करुन ओला व सुका कचरा वाहतुकीतील मनमानी आणि विकसित भागातील रस्ते दुरुस्त करून रस्त्यावरील दगड-गोटे उंच भाग तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
यावल शहरात ओला व सुका कचरा संकलन करून वाहतुकीचा ठेका ठेकेदाराला देण्यात आला आहे परंतु ठेकेदार बाहेर गावाला राहत असल्यामुळे स्थानिक पंटर ओला व सुका कचरा वाहतुकीत मोठी जादू करून वजन माप करताना एखाद्या व्यापार्‍याच्या दृष्ट प्रवृत्ती सारखी वजनाच्या मापात पाप करून ओला व सुका कचऱ्याचे वजन वाढवून घेत असल्याने राजकारणातच अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ओला व सुका कचरा वाहतांना वजन काट्यावर घंटागाडीचे वजन करताना एका घंटागाडीत अंदाजे वीस किलो कचरा असतांना यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वजन काट्यावर किती कचरा संकलित करण्यात आले त्याची वजनाची पावती घेण्यात येते. म्हणजे घंटागाडीच्या एका फेरीत वीस किलो कचरा संकलित करण्याचे दाखविण्यात येते परंतु ठेकेदाराचे पंटर पुन्हा हीच घंटागाडी ठराविक भागात नेऊन 20 किलो कचऱ्यात पुन्हा 5 ते 10 किलो कचरा टाकून यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर पुन्हा ती घंटागाडीची दुसरी फेरी दाखवून 30 ते 35 किलो कचरा संकलित करण्याचा कट रचून वीस किलो कचरा असताना 35 किलो कचरा दाखविला जातो म्हणजे एकाच घंटागाडीचे दोन वेळा वजन करण्यात येत असल्याचे कुभांड संबंधित ठेकेदाराकडून नियोजनबद्धरीत्या दाखविण्यात येत आहे याकरता यावल नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घंटागाडीचे वजन काट्यावर वजन माप करताना प्रत्यक्ष खात्री करून ती घंटा गाडी सरळ कचरा डेपो वर जाऊन खाली होते किंवा नाही याची खात्री केल्यास कचरा संकलनातील मोठा घोळ निदर्शनात येऊन ओला व सुका कचरा वाहतूक ठेकेदार आपल्या पंटरा मार्फत यावल नगरपालिकेची आर्थिक पिळवणूक कशी करीत आहे हे लक्षात येईल.
गेल्या दोन महिन्यापासून यावल शहरात विकसित भागात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते आणि आहे या भागात पाईप लाईन टाकताना रस्ता खोदण्यात येतो पाईपलाईन टाकल्यानंतर त्या पाईप लाईन वर खोदलेली माती व्यवस्थित रित्या दाबली न गेल्याने संपूर्ण रस्त्यावर मातीचे ढीग आणि मोठे खड्डे व उंच भाग निर्माण झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असल्याने पायदळ चालणाऱ्यांना आणि दुचाकी चालवणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावल नगरपालिकेने पाईप लाईन टाकताना संबंधित ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्ती किंवा सपाटी करण्याचे काम तात्काळ करून न घेतल्याने यावल शहरात यावल नगरपालिकेविषयी आणि संबंधित लोकप्रतिनिधी बाबत संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.
तरी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी ओला व सुका कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराकडून आणि पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून कार्यारंभ आदेशानुसार तात्काळ काम करून घ्यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *