यावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात भुरट्या चोरट्यांची किंमत वाढली.

रस्त्याने पायदळ चालणाऱ्याचा मोबाईल जबरीने हिसकाऊन चोरटा मोटरसायकल ने फरार.

यावल (सुरेश पाटील): यावलकर नागरीकांनो सावधान व्हा काल दि.27मंगळवार रोजी संध्याकाळी संचारबंदी व र्निमन्युष्य रस्त्यावर कुणीच नसल्याचा फायदा घेत मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात भामटयानी एका पादचाऱ्याचा मोबाइल हातातुन हिसकावुन पसार झाल्याची घटना घडली असुन याबाबत मोबाईलधारकाने रात्रीच पोलीसात तक्रार दिल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की विजय सुधाकर कोष्टी वय३० वर्ष राहणार फालकनगर यावल हा रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना मोबाईलवरुन कुणाशी बोलत असताना मागुन अचानक भुसावळ टी पॉईंट वरून जात असतांना मोटरसायकलवर आलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या हातातील १३ हजार रूपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल हिसकावुन भुसावळ मार्गावर पोबारा केल्याची घटना घडली आहे.दरम्यान जळगाव शहरात एक मोठी टोळी ही पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावुन पळ काढण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या असुन,मोबाइल हातातून हिसकावून घेवुन पळणारे हे यावलकडे सक्रीय झाले आहे की काय? प्रश्न उपस्थित केला जात असून सहजपणे बेसावध राहुन संभाषण करणाऱ्या नागरीकांना सावधान करणारी ही घटना आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *