यावल शहरात 12 पैकी 9 स्टेट बैक सेवा केंद्र मूळ ठिकाणी नाही

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात 12 पैकी 9 स्टेट बैक सेवा केंद्र मूळ ठिकाणी नाही

स्टेट बँक मॅनेजर चे नियंत्रण नसल्याचा विपरीत परिणाम

यावल (सुरेश पाटील): भारतीय स्टेट बँक शाखा यावल तर्फे यावल शहरात कोर्ट रोड, मेनरोडवर आणि जिनिंग व्यापारी संकुलंनात अशी एकूण 3 अधिकृत सेवा केंद्र ग्राहकांच्या तात्काळ सुविधांसाठी भारतीय स्टेट बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु शहरात 8 ते 9 बँक सेवा केंद्र चालकांनी निश्चित करून दिलेल्या ठिकाणी,पत्त्यावर, किंवा ज्या त्या गांवात निश्चित केलेल्या ठिकाणी ठिकाणी सेवा केंद्र सुरू न करता अनधिकृतपणे शहरात बँक सेवा केंद्र सुरू केली आहे त्यात 8 ते 9 बैक सेवा केंद्र संचालक सेवा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांची पद्धतशीरपणे दिशाभूल करून सेवा देताना, विमा भरणा करताना, पावती न देता 30 रुपये जास्त घेत असल्याने ( विम्याची रक्कम फक्त 12 रुपये असताना ग्राहकाकडून प्रत्यक्षात 42 रुपये बिना पावतीने घेत आहेत) याबाबत ग्राहकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्टेट बँक मॅनेजर चे नियंत्रण नसल्याने स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावल येथील स्टेट बँक शाखेशी जोडलेल्या काही ग्राहक सेवा केंद्र (यावल शहरातील अधिकृत 3 सेवा केंद्र वगळता) चालकांनी अनेक विमाधारकांना न विचारता अनेक लोकांचे विमे काढताना जास्त पैसे घेऊन विमे काढून अनेक लोकांची फसवणूक करीत आहे,याकडे ग्राहक संघटनांचे आणि लोकप्रतिनिधींचे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, तरी ही बाब ग्राहकांच्या लक्षात येताच स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे, हा घोळ मार्च 2020 सुरुं झाला असल्याचे बोलले जात आहे.

ही वस्तुस्थिती काही गरजू खातेदारांनी बँक मॅनेजरच्या लक्षात आणून दिली असता यावल स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी काही संबंधित ग्राहकांना सांगितले की(त्याचा कडे विमा काढला आहे आणि विमा पावती नसली तरी काही फरक पडत नाही) यावल शहरातील काही ग्राहक सेवा केंद्र चालकांशी कोणाची काही बोलायची हिम्मत होत नाही,बँक सुद्धा काही action घायला तयार नाही यामुळे स्टेट बँकेच्या भोंगळ कामकाजाविषयी आणि भूमिकेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून संबंधित ग्राहकांनी आपल्या समस्या कोणाकडून सोडवाव्यात असे सुद्धा बोलले जात आहे.
ग्राहक सेवा केंद्र चालकाने 30 रुपये जास्त घेऊन लोकांचे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना 12 रुपये प्रमाणे विमे काढले आहे,12 रूपयाचा प्रधान मंत्री सुरक्षा बीमा असताना ग्राहकां कडून 30 रूपये जास्त घेवून म्हणजेच 42 रुपये घेऊन तो विमा दिला जात आहे. तरी यात ग्राहकांनी लूट होत आहे. याच प्रमाणे अटळ पेन्शन योजना ग्राहकांना न सांगता परस्पर दरमहा ग्राहकांच्या खात्यावरून 250 ते 251 रुपये कपात करण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आणि बऱ्याच लोकांना ग्राहकांना न सांगता विमा काढून जास्त पैसे घेऊन पैसे मागितले जात आहे.

पैसे नाही देले तर विमाची पावती सुद्धा दिली जात नाही. याबाबत काहीनी स्टेट बँकेचे मॅनेजर यांची भेट घेऊन माहिती दिली असता मेनेजर साहेब संबंधित काही विमा ग्राहकांना उडवा उडवीची उत्तर दिल्याचे बोलले जात आहेत.
तरी या ग्राहक सेवा केंद्रावर पैसे काढण्या साठी आलेल्या अशिक्षित लोकांचे परंस्पर अटळ पेन्शन योजनेचे विमे काढले जात आहे तरी काही ग्राहक सेवा केंद्र चालकांवर चौकशी होऊन कार्यवाही होणार आहे किव्वा नाही असे ग्राहकांमध्ये बोलले जात आहे यावल स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी संबंधित सेवा केंद्राची चौकशी करून
कारवाई न केल्यास संबंधित काही ग्राहक स्टेट बँकेच्या विरोधात उपोक्षण करणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *