यावल शहरात 22 कोरोना बाधित रुग्ण, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू , 2 जणांना डिस्चार्ज, 17 जण कॉरंनटाईन
यावल शहरात 22 कोरोना बाधित रुग्ण, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू , 2 जणांना डिस्चार्ज, 17 जण कॉरंनटाईन
शहरातील अनेकांचे अंत्यसंस्कार परस्पर केल्याने यावलकरांना मोठा धोका.
तालुक्यात पोलीस, डॉक्टर, वकील, पोस्ट कर्मचारी, बँक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, लोकप्रतिनिधी इत्यादींना कोरोनाची बाधा.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल शहरातगेल्या पंधरा दिवसापासून तर दिनांक 4 जून 2020 गुरुवार रोजी रात्री उशिरापर्यंत एकूण 22 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर कॉरनटाईन केलेल्या 17 रुग्णांपैकी 2 रूग्णांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
तसेच गेल्या महिन्यात संपूर्ण यावल शहरात अनेक ठिकाणी एकूण 25 ते 30 नागरिकांचा मृत्यू झाल्याने त्यापैकी काही मयताच्या नातेवाईकांनी त्या मयतावर तात्काळ म्हणजे 1 ते 2 तासाचे आत अंत्यसंस्कार करून घेतले असल्याने तसेच मयतामधील काहीजण वृद्धापकाळाने, हृदयविकाराने दिर्घ आजाराने मयत झाले तर काही जणांना कोरोना बाधा झाल्याने मृत्यू झाला होता आणि आहे परंतु त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला माहिती न देता परस्पर अंत्यविधी आटोपून टाकलेला आहे अंत्यविधी करताना अनेक जण संपर्कात आल्याने यावल शहराला आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून मोठा धोका निर्माण झाला असल्याचे संपूर्ण यावल शहरात व मयताच्या त्या काही नातेवाईकांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.
यावल शहरात कोरोना बांधीत काही नागरिकांचा मृत्यू होतो आणि मयताचे नातेवाईक शासकीय यंत्रणेला कोणतीही माहिती न देता मयतावर परस्पर अंत्यसंस्कार करून टाकतात हे यावल नगरपरिषद यंत्रणेला, महसूल विभागाला, पोलीस खात्यातील गोपनीय विभागाला आणि आरोग्य विभागाला एक मोठे आवाहन असून याकडे शासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरातील नागरिकांना आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून मोठा धोका निर्माण झाला असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहरात सुदर्शन चित्रमंदिर चौकात 3. पुर्णवादनगर मध्ये 1 मयत, तिरुपती नगर मध्ये 1 मयत, बाबूजी पुरामध्ये 4 जण, वसुले गल्लीत 3 त्यापैकी 1 घरी परत, सिद्धार्थनगर मध्ये 2 त्यापैकी 1 मयत, लायब्ररी जवळ 1, कोलते वाड्यात 1, खाटीक वाड्यात 1 मयत, जिनिंग प्रेस कॉम्प्लेक्स मध्ये 1, विजय स्वामील परिसरात 1, डांगपुरा परिसरात 1 मयत, आयेशानगर मध्ये 1 याप्रकारे कोरोना बाधित रुग्ण होते त्यापैकी दोन 2 रुग्ण परत घरी आले आहेत. आणी 12 रुग्णांना कॉरनटाइन केले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात किंवा निगेटिव्ह येतात याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.
यावल शहरात एक पोलिस, एक वकील, 3 डॉक्टर, काही न्यायालयीन कर्मचारी, बाहेरगावाहून येणारा जाणारा पोस्टातील कर्मचारी, आय.डी.बी.आय.बँकेतील बाहेरगावाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यास आणि शासकीय नियुक्त एका जबाबदार प्रतिनिधी कोरोना विषाणूचा विपरीत परिणाम सहन करावा लागला त्यामुळे संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात स्वयंसेवक नियुक्ती नाही.
नगरपालिकेकडून दिशाभूल.
यावल शहरात गेल्या 20 तारखे पासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सुदर्शन चित्र मंदिर परिसर, पूर्णवादनगर, तिरुपती नगर, बाबुजीपुरा, वसुलेगल्ली, सिद्धार्थनगर, लायब्ररीजवळ, खाटीक वाडा, जिनिंग प्रेस व्यापारी संकुल, विजय स्वामिल परिसर, डांगपुरा, आयेशा नगर इत्यादी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून यावल नगरपालिका, यावल महसूल, यावल पोलीस यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले होते आणि आहे,
वरील सर्व परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना अत्यावश्यक आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावल नगरपालिकेने स्वयंसेवकांची नियुक्ती केली असल्याचा कांगावा देखावा केलेला असला तरी यावल नगरपालिकेने स्वयंसेवकांना आज पावेतो कोणतेही लेखी किंवा तोंडी सूचना न दिल्याने स्वयंसेवकांनी कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित क्षेत्रात कोणालाही मदत केलेली नाही त्यामुळे यावल नगरपालिकेने स्वयंसेवक नियुक्त केल्याचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरविणे दिशाभूल व फसवणूक केलेली आहे त्यामुळे फैजपूर प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी चौकशी व खात्री करून यावल न.पा.वर कड़क कारवाई करावी अशी मागणी प्रतिबंधित क्षेत्रातील अनेक नागरिकांकडून केली जात आहे.