कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करताना जातीय सलोखा खड्ड्यात

Featured जळगाव
Share This:

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करताना जातीय सलोखा खड्ड्यात

एकाच गांवातील 2 मृत कोरोना ग्रस्तांना वेगवेगळे निकष.

कोरोना योद्धापुढे शासकीय यंत्रणा नतमस्तक.

यावल ( सुरेश पाटील ): एकाच गांवातील 2 कोरोना ग्रस्तांवर अंत्यसंस्कार करताना जिल्हास्तरावरून आणि तालुका स्तरावरून जातीय सलोखा खड्ड्यात दफन करण्यात आला असल्याची घटना घडली. या घटनेत एका कोरोना योद्धापुढे संपूर्ण शासकीय यंत्रणा नतमस्तक झाल्याने आणि आरोग्य विभागासह संबंधित शासकीय यंत्रणेने बेजबाबदारपणे कर्तव्यात कसूर केला असल्याने जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्काळ कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
एका कोरोना योद्धाचा जवळचा नातेवाईक कोरोनाग्रस्त म्हणून मयत झाल्याने त्या मृत व्यक्तीवर त्याचे राहते गांवात अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत त्या गांवात कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्याच गांवातील एक कोरोनाग्रस्त व्यक्ती औषध उपचार घेत असताना कोविड सेंटरला मृत झाला. परंतु तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्पष्ट नकार देऊन त्यांनी त्या मृत व्यक्तीवर रस्त्यातील एका गांवाजवळ तापी नदीच्या किनाऱ्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यामुळे आरोग्य विभागाने आणि शासकीय यंत्रणेने कोरोनाग्रस्त वर अंत्यसंस्कार करताना पक्षपातीपणा,भेदभाव करुन जातीय सलोखा खड्ड्यात दफन केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीचा नातेवाईक कोरोना योद्धा म्हणून आरोग्य यंत्रणेशी संलग्न असल्यामुळे तसेच तो कोरोना योद्धा आपल्या एका अवैध व्यवसायाच्या माध्यमातून पोलिसांचा खास समर्थक असल्याने त्यांनी सर्व शासकीय नियमांची पायमल्ली करून आपल्या नातेवाईकावर स्वतःच्या गांवी अंत्यसंस्कार करून घेतले आणि शासकीय यंत्रणेला आणि समाजाला आपला प्रभाव दाखवून दिला. यामुळे सर्वस्तरात संतप्त भावना आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागासह संबंधित शासकीय यंत्रणेने बेजबाबदार पणे कर्तव्यात कसूर केला असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी असे सर्वस्तरातून बोलले जात आहे.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *