कर्नाटक विधानपरिषदेत गदारोळ, काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना खुर्चीवरुन खेचले

Featured देश
Share This:

 

बंगरुळु (तेज समाचार डेस्क).कर्नाटक विधानपरिषदेमध्ये मंगळवारी जोरदार गदारोळ झाला. गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. त्याआधीच काँग्रेस (Congress) आमदारांनी उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचले!

सभागृहाचे कामकाज चालू होताच काँग्रेस आमदारांनी, उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणे असवैधानिक आहे असे म्हणून उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. उपसभापतींना सोडवण्यासाठी मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.

उपमुख्यमंत्री अश्वथानारायण (Ashwathanarayana) आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक वादावादी सुरू झाली. काँग्रेसने विधानपरिषदेच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *