
BHR प्रकरणात जळगाव येथील एका सोने-चांदीच्या फर्मसह यावल येथील एका व्यापाऱ्याची सुद्धा चौकशी होणार?
बीएचआर प्रकरणात जळगाव येथील एका सोने-चांदीच्या फर्मसह यावल येथील एका व्यापाऱ्याची सुद्धा चौकशी होणार?
यावल तालुका जिनिंगप्रेसचे लाखो रुपये भाडे बीएचआरकडे थकीत.
यावल (सुरेश पाटील): भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तसेच रोखीने कर्ज परत न करता ठेवीदारांच्या ठेव पावत्या मूळ रकमेच्या फक्त 25 ते 30टक्के अत्यल्प दराने कमी किमतीत खरेदी करून घेतलेल्या लाखो रुपयाच्या कर्जापोटी जळगाव येथील सोने-चांदीच्या एका फर्म संचालकाच्या मध्यस्थीने जमा केलेल्या कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अल्पावधीत कोट्यधीश झालेल्या यावल शहरातील एका व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक प्रकरण सुद्धा उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे. यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तथा यावल तालुका जिनिंग प्रेस मालकीचे यावल व फैजपुर येथील व्यापारी संकुलनातील एकूण आठ गाळयाचे मासिक भाडे सन2015पासून व्याजासह 8ते9लाख रुपये थकीत असल्याची चर्चासुद्धा सहकार क्षेत्रात सुरु झाली आहे.
यावल येथे यावलतालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघातील व्यापारी संकुलनात तीन ते चार गाळयामध्ये भव्य अशी बीएचआर पतसंस्थेची शाखा उघडण्यात आली होती,आता ती शाखा बंद आहे या शाखेतून यावल शहरात मेन रोडवर असलेल्या एका व्यापाऱ्यांने कर्जदाराने गेल्या5वर्षांपूर्वी कर्ज परत करताना बीएचआर पतसंस्थेशी सामाजिक, आणि संस्थेशी संबंध असलेल्या जळगाव येथील एका सोने-चांदी खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने बीएचआर पतसंस्थेकडून घेतलेले लाखो रुपयाचे कर्जाची रक्कम रोखीने कर्ज परत न करता ठेवीदारांच्या ठेव पावत्या मूळ रकमेच्या25ते30टक्के अल्पदराने खरेदी करून घेऊन स्वतःच्या कर्जापोटी जमा केले असल्याचे प्रकरणाबाबत सुद्धा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे या प्रकरणासह इतर अनेक प्रकरणांची किंवा गेल्या10वर्षात ज्या ठेवीदारांच्या पावत्या बीएचआर मध्ये जमा झालेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागामार्फत संयुक्त सखोल चौकशी कार्यवाही तपास केल्यास अनेक प्रकरणे उघडकीस येतील असे ठेवीदारांत बोलले जात आहे.
बीएचआर पतसंस्थेने यावल
शाखेमार्फत यावल शहरातील काही व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना आपल्या पतसंस्थेत मुदत ठेवी रकमा ठेवण्यासाठी आव्हान केले होते, त्यानुसार अनेकांनी ठेवींच्या रकमा ठेवलेल्या होत्या परंतु संस्थेने कर्जदारांकडून रोख स्वरूपात रकमा न घेता सोयीनुसार कर्जदारां मार्फत अल्पदराने मुदत ठेवीच्या पावत्या खरेदी करून तडजोडीने कर्ज प्रकरण मिटविले आहेत त्यामुळेच यावल तालुका जिनिंग प्रेसला थकित मासिक भाडे मिळालेले नाही असे सुद्धा सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.