सात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला

Featured जळगाव
Share This:

सात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला.

यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले यांचे आदेशानुसार आज यावल येथे लक्षणीय आंदोलन मा.प्रभाकर आप्पा सोनवणे व मा.भगतसिंग बापु पाटील यांची प्रमुख उपस्थितात एच पि.पम्प येथे आरती करण्यात आली आणि केंद्र सरकार चे 30 मे 2021 रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत.मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे,देशाची ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना साथ रोगामध्ये नियोजनातील अपयश,दररोज पेट्रोल व डिझेल भाववाढ,नोटबंदी व जीएसटीसारखे अपयशी निर्णय देशातील वाढती बेरोजगारी,शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे इत्यादी पातळींवर केंद्रातील मोदी सरकार अपयशी झाले आहे.या वेळेस उपस्थित शहराध्यक्ष कदिर खान,नगरसेवक रसुल शेठ,ओबिसी सेलचे अध्यक्ष अमोल भिरुड, नगरसेवक समिर मोमिन,तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहेमान खाटीक,शहर सरचिटणीस नईम शेख,मागसवर्गीय अध्यक्ष विक्की गजरे,युनुस भाई,अस्लम शेख, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *