साताऱ्यात सहा आगारांतील 35 गाड्या भंगारात

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क): ग्रामीण भागांतील वाडीवस्तीपासून ते शहरी भागांतील लोकांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) जिल्ह्यातील सहा आगारांतील ३५ बस भंगारात काढण्यात आल्या असून, या बस (Bus) सुट्या करण्याचे काम सध्‍या येथील आगारात सुरू आहे. एसटी बसचा दहा वर्षांचा कालावधी अथवा किलोमीटरची क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्या भंगारात काढल्या जातात.

याबाबत अधिक माहिती अशी, एसटी बसचा दहा वर्षांचा कालावधी अथवा किलोमीटरची क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्या भंगारात काढल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, कोरेगाव, दहिवडी, फलटण, वडूज या सहा आगारांतील एकूण ३५ एसटी बस भंगारामध्ये विकण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. पुणे येथील एका व्यापाऱ्याने ही निविदा भरून त्याचा ठेका घेतला. जिल्ह्यातील विविध आगारांतील अशा बस येथील आगारात आणण्यात आल्या. त्या बसची चांगली इंजिन आदी साहित्य काढून केवळ भंगारात जाणारे साहित्य त्या बसला ठेवण्यात आले.

या वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील तांत्रिक अधिकारी श्री. मोहिते, श्री. वाघ, श्री. पठारे, आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल व वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी बस व निविदेची तपासणी केली. त्यानंतर क्रेनच्या साह्याने या ३५ बस बाहेर काढल्या. दहिवडी रस्त्यावरील एका मोकळ्या जागेत सध्‍या या बस सुट्या करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील वाडीवस्तीपासून ते शहरी भागातील लोकांना सुरक्षित प्रवास देणारी सर्वांची लाडकी लालपरीची मोडतोड होत असल्याचे पाहून राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या चेहऱ्यावर दु:खद असे सावट दिसत होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *