मालेगावात करोना पॉझिटिव्ह रूग्णांनी 100 गाठली

Featured नाशिक
Share This:

मालेगाव (तेज समाचार डेस्क): मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील रुग्णांनी शंभरी गाठली आहे. आज एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले असून शहरातील रुग्णांची संख्या १०१ झाली आहे. यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आताच मिळालेल्या आकडेवारीनुसार मालेगाव शहरात आज दि.२३ एप्रिल रोजी ५ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून यातील सर्व रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांमध्ये ५ ही पुरुषांचा समावेश आहे. शहरात रुग्णाची संख्या १०१ झाली असून यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगावात शंभरी गाठल्याने करोनाचे तांडव सुरूचे असल्याचे चित्र आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांची संख्या ११५ वर गेली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *