धुळे जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांची वाढ, 437 वर गेला आकडा

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांची वाढ, 437 वर गेला आकडा

 

धुळे (तेज समाचार डेस्क): कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. जिल्ह्यातील आणखी १५ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील चार तर तालुक्यातील फागणे येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच शिरपूर येथील सात व दोंडाईचा येथील एका रूग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नाशिक येथे उपचार घेत असलेल्या शिरपूर व धुळे शहरातील प्रत्येकी एका रूग्णालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

रुग्णसंख्या 437 वर पोहचली

जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५८ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात २१/पु रमापती चौक धुळे,  ४१/पु रामपती चौक धुळे, ६५/स्त्री सरस्वती कॉलनी दत्तमंदिर धुळे, ५६/स्त्री शिवाजी नगर धुळे, ७/ मुलगी फागणे यांचा समावेश आहे. दुसरा अहवालातील  उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १५ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ४०/पु R C पटेल कॉलनी, ५८/पु कुंभार टेक, ६०/पु फुले चौक वरवाडे, ५८/स्त्री फुले नगर वरवाडे, ४८/स्त्री पाटीलवाडा, १५/मुलगी समर्थ कॉलनी करवंद, ११/मुलगा समर्थ कॉलनी करवंद यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या अहवालात  उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ७ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यात ५०/ पु.  विद्या कॉलनी यांचा समावेश असून आज मंगळवार (१६ जून) असे एकूण १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *