baban chaudhary

धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांचा बांधावर पिक विमा भरावेत : भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

Featured धुळे
Share This:

मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, कृषीमंत्री ना. दादा भुसे यांचाकडे मागणी
धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांचा बांधावर पिक विमा भरावेत : भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

 शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): धुळे जिल्ह्यात सध्याची परिस्थिती पाहता पिक विमा काढण्यासाठी शेतकरी बांधवांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेऊन पिक विमा बांधावर भरुन घ्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांचाकडे भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची मुदत वाढवून शेतकऱ्यांच्या बांधावर भरून घेण्याबाबत शासनाने योग्य ते नियोजन करावे आणि गोरगरीब जनतेसाठी विशेष पॅकेजची घोषणा हि करावी अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे (दि.१८ जुलै) रोजी पाठवलेल्या ईमेल पत्राव्दारे केली आहे. निवेदनाची प्रत कृषीमंत्री ना. दादा भुसे, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांना हि पाठवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात धुळे जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी भयभीत झालेला आहे. अशा परिस्थितीत बँकांसमोर पीक विमा भरण्यासाठी होत असलेली गर्दी टाळण्यासाठी पिक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांचा पिक विमा बांधावर भरून घेण्याबाबत प्रशासना मार्फत योग्य ती कार्यवाही करून नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन करावे अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली असुन जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला केंद्र शासनाकडून लाॅकडाऊनच्या काळात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनानेही एक विशेष पॅकेज देण्याबाबत घोषणा करावी त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी राज्य शासन आणि प्रशासन यांनी खबरदारी घ्यावी असे हि मागणीत नमूद करण्यात आले आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *