
धुळे जिल्ह्यात 21 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्ण संख्या 102
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): शुक्रवारी तब्बल 21 रूग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या 102 वर पोहोचली आहे.
शहरात १५ रूग्ण आढळले आहेत. साक्री व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोघांना लागण झाली आहे तर शिरपूर व धुळे तालुक्यातील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.