
देशमुखवाड्यात पथदिवे बंद तर अनेक भागातपथदिवे सकाळी उशिरापर्यंत सुरु
देशमुखवाड्यात पथदिवे बंद तर अनेक भागात
पथदिवे सकाळी उशिरापर्यंत सुरु.
यावल शहरात विजेच्या लपंडावाने नागरिक,व्यवसायिक हैराण.
यावल (सुरेश पाटील): यावल शहरात देशमुखवाड्यात बस मळापासून महादेव मंदिरा पर्यंत तसेच इतर काही भागात रात्रीच्या वेळेस पथदिवे पूर्णपणे बंद राहतात तर अनेक भागात सकाळी उशिरापर्यंत पथदिवे सुरू राहत असल्याने आणि यावल शहरात दिवसा एक एक,दोन दोन तासाने विजेचा लपंडाव सारखा सुरू असल्याने नागरिक व व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनी दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच ट्री कटिंग चे काम करीत असते यावल वीज वितरण कंपनीने ही कामे पावसाळ्यापूर्वी केली आहे किंवा नाही तसेच यावल शहरात एक एक,दोन दोन,तासाने वीजपुरवठा खंडित का केला जातो? एक एक दोन दोन तासाने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरण कंपनी आपल्या वरिष्ठांकडे सूचना देऊन वीज पुरवठा खंडित करणे बाबत परवानगी किंवा परमिट घेतात का?भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत नव्हता मग आता पावसाळ्यात नेहमी वीज पुरवठा खंडित का होतो?याकडे तसेच यावल शहरात रात्रीच्या वेळेस काही भागात पथदिवे बंद असतात तर अनेक भागात विकसित कॉलन्यामध्ये सकाळी उशिरापर्यंत पथदिवे सुरू का असतात याची चौकशी यावल नगरपरिषद व वीज वितरण कंपनीने करावी अशी मागणी यावल शहरातून होत आहे.