बामणोद ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार शिरिष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च आपले वर्चस्व राखले आहे

Featured जळगाव
Share This:

बामणोद ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार शिरिष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च आपले वर्चस्व राखले आहे

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीत सर्वाधीक लक्ष वेधणाऱ्या बामणोद ग्रामपंचायतीत कॉंग्रेस पक्षाचे रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च कॉंग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम राखली आहे . यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असुन बामणोद ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे,यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी , यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने बामणोद ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असुन,भाजपा प्रणीत पॅनलचे या निवडणुकीत दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.बामणोद ग्रामपंचायत मध्ये 2 वेळा सरपंच सांभाळणारे कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते शिवराम किसन तायडे यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले असुन,या निवडणुकीत पॅनल प्रमुख शिवराम तायडे यांच्यासह त्यांचा नातु व सुन यांनी ही या निवडणुकीत विजय मिळवले आहे.या निवडणुकीत विजयी उमेदवार प्रभाग निहाय पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक१ शिवराम किसन तायडे यांना मिळालेली मते २८४,याच प्रभागातील उमेदवार तुषार दिलीप ढाके यांना मिळालेली मते ४२३ विजयी,प्रभाग क्रमांक1-मधील प्रतीभा गुणवंत निळ मिळालेली मते ५१९प्रभाग क्रमांक2- गिरीश विलास तायडे मिळालेली मते ४४९ विजयी, प्रभाग2- वैभव रमेश येवले, मते415 विजयी,याच प्रभागातुन विजयी मनिषा गोपाळ जावळे मिळालेली मते 485, प्रभाग क्रमांक 3 दिलीप छन्नु बाविस्कर यांना मिळालेली मते 424 विजयी,निलीमा दिलीप बावीस्कर यांना मिळालेली मते 394 विजयी, प्रभाग3- नथाबाई कैलास तायडे मते281 विजयी,प्रभाग क्रमांक-4 तुषार दिलीप जावळे यांना मिळालेली मते ४५८ विजयी, याच प्रभागातील सुजाता चंद्रशेखर कोल्हे मते ४१२ विजयी,प्रभाग चार मधील विजयी दिपाली चंद्रकांत राणे यांना मिळालेली मते ३७८ विजयी,प्रभाग क्रमांक5- मधील विजयी उमेदवार सुनिल फकीरा केदारे यांना मिळालेली मते605 याच प्रभागातील दुसरे विजयी उमेदवार छाया गौतम केदारे मते 648 विजयी व याच प्रभागातील दुसरे विजयी उमेदवार जरीना उस्मान तडवी यांना मिळालेली मते 633 असे असुन सर्व विजयी उमेदवारांचे बामणोद ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *