10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश!
10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश!
मुंबई (तेज समाचार डेस्क): भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात असताना, यातच जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
10 चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर आता सरकार जागं झाल्याचं दिसत आहे. कारण अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी, राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयात झालेल्या बाळांच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांनी दुख व्यक्त केलं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
तसेच या दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही अजित पावर यांनी सांगितलं आहे.