
गोवंश जातीच्या चामड्याची यावल शहरातून आयात व निर्यात
गोवंश जातीच्या चामड्याची यावल शहरातून आयात व निर्यात
यावल न्यायालय व ऐतिहासिक किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावरून चामड्याची अनधिकृत वाहतूक
यावल ( सुरेश पाटील): आज दिनांक 27 शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यावल शहरातील नगरपालिका जवळील ऐतिहासिक किल्ला आणि न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हडकाई–खडकाही नदीपात्रातून गोवंश जातीच्या ओल्या चामड्याची अवैध वाहतूक (आयात आणि निर्यात) करतानाचे 2 ट्रक आढळून आल्याने यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची गुप्त खबर यावल पोलिसांना मिळाली होती आणि आहे.
या दोन्ही ट्रक मालक चालकासह व ट्रक मध्ये असलेल्या गोवंश जातीच्या चामड्याची चौकशी आणि पुढील कार्यवाही यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांचे पोलीसपथक यांनी सुरू केली असल्याचे समजले.
यावल पोलिसांनी या अनधिकृत अवैध गोवंश जातीच्या चामड्याची वाहतूक यावलहुन कुठे? किंवा बाहेरगावाहून कुठून? आयात निर्यात होत आहे का? या सर्व प्रकरणाची प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी व दोन्ही ट्रक जप्त करावेत अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.