“तेज़ समाचार” IMPACT: गुटख्याची बातमी यावल शहरातील कारवाई होते फैजपुरात

Featured जळगाव
Share This:

“तेज़ समाचार” IMPACT: गुटख्याची बातमी यावल शहरातील कारवाई होते फैजपुरात

2 लाखाचा माल पंचनामा करताना झाला 50 हजारचा.
       
प्रभारी पोलिस अधिकाऱ्याची कारवाई तालुक्यात चर्चेला उधाण
यावल दिनांक 14 ता.प्र. यावल शहरात जर्दा,  विमल गुटख्याची बातमी यावल शहरातील कारवाई होते फैजपुरात.
यावल ( सुरेश पाटिल ):  यावल शहरात गायछाप पटेल जर्दा,  गुटखा, अवैध विक्रीतून लाखो रुपयांची कमाई असे वृत्त दिनांक 12 जून 2020 रोजी तेज़ समाचार मधून प्रसिद्ध करण्यात आले होते परंतु याबाबत यावल शहरात कारवाई न होता फैजपुर शहरात प्रभारी पोलीस उपनिरीक्षक यांनी संधी साधून फैजपूर शहरातील एका  गुटखा विक्रेत्याच्या गोडाऊन मधुन लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला, अन्न व औषध प्रशासन अधिकारी विवेक पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला असला तरी पंचनामा करताना दिड ते दोन लाख रुपयांचा गुटखा पन्नास हजार रुपयाचा दाखविल्याने तसेच  फैजपूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. वानखेडे हे कोरोना बाधित झाल्याने कॉरनटाईन झालेले आहे, त्यामुळे प्रभारी अधिकारी म्हणून त्यानी जी कारवाई केली ती कारवाई त्यांनी कशामुळे आणि का केली ? याबाबत फैजपुर शहरासह संपूर्ण तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की फैजपुर शहरात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या गुटख्यावर पोलिसांनी धाड टाकून पन्नास हजाराचा गुटखा शुक्रवारी रात्री उशिरा जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी विवेक पाटील यांच्या फिर्यादीनुसार मोहम्मद साबिर मोहम्मद युसुफ ( मिल्लत नगर ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ( या घटनेत विक्रेत्याचे दुकान मेन रोडवर आहे आणि गोडाऊन दुसऱ्या ठिकाणी आहे ) मिल्लत नगर येथे गुटखा विक्रीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उमेश पाटील, विनोद पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून 50 हजार 72 हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू हस्तगत करून पुढील कार्यवाही केली असली तरी दुकान मालकाच्या गोडावून मध्ये आणि दुकानात अवैध गुटखा  किती लाखाचा होता याबाबत फैजपूर शहरासह तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

यात 10  रुपयांची गायछाप पटेल जर्दा पुडी 20 रुपयाला, पटेल जर्दा 10 रुपयाची पुडी 15 रुपयाला, सिगारेट पाकीट 90 रुपयाचे 120 रुपयाला, 30 नंबर बिडी बंडल 20 रुपयाचे  30 रुपयात, उंट बिडी बंडल 15 रुपयाचे  20 रुपयात, विमल गुटका पूड़ी 10 रुपयाची पुडी 30 रुपयाला, 20 रुपयांची विमलपुडी 60 रूपयाला खुलेआम सर्वत्र विक्री होत आहे अशाप्रकारे काळ्याबाजारात अव्वा की सव्वा दराने विक्री करण्यात येत आहे , यावल तालुक्यात ठिकठिकाणी पटेल जर्दा व  गायछाप पटेल जर्दा पुडी, विमल गुटखा पुडी, बिड़ी, सिगारेट ग्राहकांना किरकोळ व्यवसायिकांना घरपोच दुकान पोहच छुपा पद्धतीने बिनधास्तपणे सर्रास विक्री करून लाखो रुपयांची कमाई करून  घेत आहे, जे दुकानदार जास्त भाव देत नाहीत त्यांना हे अवैध गुटखा विकणारे कोणताही माल विक्री करीत नाहीत हे विशेष. तसेच हे अवैध धंदे करणारे आपल्या ग्राहकांना कोणतीही पावती किंवा बिल देत नाही त्यामुळे यावल व फैजपुर पोलीसांनी अन्न व औषध प्रशासन, विक्रीकर अधिकारी, आयकर अधिकारी, वजन व मापे निरीक्षक, यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेत असणाऱ्या सर्व अवैध गुटखा विक्रेत्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *