एक महिन्यात घरपट्टी सुट द्या अथवा माफ करा न झाल्यास अमर उपोषण करणार – डॉ. चौधरी

Featured नंदुरबार
Share This:

एक महिन्यात घरपट्टी सुट द्या अथवा माफ करा न झाल्यास अमर उपोषण करणार – डॉ. चौधरी

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार नगरपरिषदेची सर्व साधारण सभेत सहा महिन्याची घरपट्टी माफ करा अथवा सुट द्या. अशी मागणी भाजपा चे नगरसेवक तसेच नंदुरबार नगर परिषदेचे विरोधी पक्षनेता चारुदत्त कळवणकर यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रा.डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की जनतेच्या हितासाठी सहा महिन्याची घरपट्टी माफ करा. एक महिन्याभरात न केल्यास आंदोलन तसेच अमर उपोषण करणार. या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी तसेच नंदुरबार नगरपरिषदेची विरोधी पक्षनेता चारुदत्त कळवणकर तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गौरव चौधरी, आकाश चौधरी, आनंद माळी, कमल ठाकुर, लक्ष्मण माळी, नगरसेविका संगिता सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष माळी आदी उपस्थित होते.  नंदुरबार नगरपरिषदेची सर्व साधारण सभा दिनांक १६ अॉक्टोबर २०२० रोजी Video Conferencing व्दारे घेण्यात आली. त्या सभेत कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शेकडो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नंदुरबार नगरपालिका मालकीच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांना आपण भाड्यात तीन महिन्यांऐवजी सहा महिन्याचे भाड माफ करावे. तसेच शहरातील मालमत्ता धारकांना सहा महिन्याची घरपट्टी माफ करावी. नंदनगरीचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ रत्ना ताई रघुवंशी यांच्या आम्ही आदरच करतो. दिलेले आव्हान स्वीकारता आले नाही. म्हणूनच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महिला नगराध्यक्षांना धमकावल्याचा कांगावा सुरू केल्याचा आरोप प्राध्यापक डॉक्टर चौधरी यांनी केला आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या सभेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग झाली नाही, असे पत्र मुख्याधिकार्यांनी दिले आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत पेश केलेला तो व्हिडीओ नगरपालिका सभेतील नव्हताच, तसे असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिले आहे.
नगरपालिकेची live झालेली सभा चांगलीच गाजत असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत खोडलेल्या मुद्यांना भाजपने पुन्हा आव्हान दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी एखाद्या तरी भाजप नगरसेवकाला अपात्र करून दाखवा, किंवा आम्ही दोन महिन्यातच नागराध्यक्षांना अपात्र करून दाखवू असे खुले आव्हान प्रा. डॉ. रवींद्र चौधरी यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना दिले आहे. प्रा. डॉ. रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले कि , माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिनांक २३ अॉक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, नगरपालिका अधिनियमानुसार आम्हाला घरपट्टी माफीचा अधिकार नाही. मात्र केवळ सुट देण्याचा अधिकार आहे. तर आम्ही त्यांना जाहीरपणे सांगतो की , सूट देण्याच्या याच अधिकाराचा वापर करा आणि १० टक्के घरपट्टी वसूल करून ९० टक्‍के घरपट्टी सूट द्या. रघुवंशी यांचा यात काय तोटा आहे . स्वतःच्या पंटर लोकांना लाभ देणारी भूमिका घेतात तशी जनतेला लाभ देणारी सुद्धा भूमिका घ्यावी; हा आमच्या आग्रह लोकहिताच्या आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा आम्ही स्पष्ट करतो. जर महिन्याभरात याचा निर्णय नाही लावला तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून घरपट्टी माफीसाठी अमर उपोषण करणार.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *