
तेज समाचार वृत्ताची तातडीने दखल- नगरपालिकेकडून तात्काळ दखल काम सुरू
तेज समाचार वृत्ताची तातडीने दखल.
नगरपालिकेकडून तात्काळ दखल काम सुरू.
यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती
यावल (सुरेश पाटील): यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याचा व्हॉल नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी गटारीत वाहून जात होते नागरिकांनी नगरपालिकेत याबाबत तक्रार केली परंतु पाण्याचे महत्व यावल नगरपालिकेला समजल्याने संभाजी पेठ भागात पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईन वरील व्हालचे काम आज दि.5रोजी यावल नगरपालिकेने सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संभाजी पेठ भागात मधुकर साळी यांच्या घराजवळील पाणी सोडण्याचा,पाणी बंद करण्याचा व्हाल नादुरुस्त झाला होता याबाबत ऑनलाइन तेज समाचारने दि.4रोजी प्रसिद्ध केल्याने यावल नगरपालिकेने24 तासाच्या आत तात्काळ दखल घेऊन व्हाल दुरुस्तीचे काम सुरू केले यामुळे संभाजी पेठ भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.